Covid-19 cases : भारत १ कोटी रूग्ण संख्येच्या उंबरठ्यावर

Covid-19 cases : भारत १ कोटी रूग्ण संख्येच्या उंबरठ्यावर

गुरूवारपासून गेल्या २४ तासांमध्ये नवीन २२ हजार ८८९ कोरोना बाधितांच्या संख्येसह आता भारत देश १ कोटी कोरोना बाधितांच्या आकड्याच्या नजीक पोहचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या रूग्णांच्या संख्येमुळे ही संख्या आता ९९ लाख ७९ लाख ४४७ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली. नव्या ३३८ कोरोना रूग्णांच्या मृत्यूमुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी १ लाख ४४ हजार ७८९ वर पोहचली आहे. देशात सध्या ३ लाख १३ हजार ८३१ एक्टीव्ह कोरोना रूग्णांची प्रकरणे आहेत. तर एकुण डिस्चार्ज झालेल्या रूग्णांची संख्या ९५ लाख २० हजार ८२७ इतकी आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी ३१ हजार ८७ इतके कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज मिळाला.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे १७ डिसेंबरपर्यंत १५ कोटी ८९ लाख १८ हजार ६४६ इतक्या चाचण्यांमध्ये कोरोना रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यापैकी ११ लाख १३ हजार ४०६ सॅम्पल हे गुरूवारी तपासण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के इतका आहे. तर देशातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ३.२४ टक्के इतकी आहे.

देशभरात महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी ही सर्वात जास्त परिणाम झालेल्या राज्यांमध्ये असल्याचा ट्रेंड हा आजही कायम असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ६८ हजार ४७६ इतक्या अॅक्टीव्ह केसेस आहेत, त्यापाठोपाठ केरळमध्ये ५८ हजार ३३९ केसेस आहेत. भारतात कोरोनाचा धोका आधीच ओळखून वैज्ञानिक पद्धतीवर आधारीत असा कोम्बॅट एप्रोच ही सर्व स्थिती हाताळण्यासाठी वापरण्यात आला. देशात अनेक भागात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट आली. पण भारतात मात्र कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही सातत्याने कमी झालेली आहे. आपण देशात सायन्टिफिक एविडन्सवर आधारीत एप्रोच स्विकारला, त्यामुळेच कोरोनाच धोका कमी करण्यात आपल्याला यश आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

 

First Published on: December 18, 2020 1:58 PM
Exit mobile version