Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट,तर १4 जणांच्या मृत्यूची नोंद!

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट,तर १4 जणांच्या मृत्यूची नोंद!

 

मुंबईत आज, सोमवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. तर मृत्यूची संख्येत वाढ झाली. आहे. तसेच आज कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत 402 नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट झाली असून 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख 78 हजार 733 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ७16 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज ५77 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख 7 हजार 129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ६ हजार 349 जणांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत 23 हजार 481 नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ७७ लाख 89 हजार 733नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 9 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यामध्ये 9 पुरुष व 8 रुग्ण महिल्या होत्या. 7 रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ६ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. १3 जुलै ते १8 जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०6 टक्के असून दुप्पटीचा दर १०34 दिवस आहे. मुंबईत सध्या सक्रिय कंटेनमेंट जोन ६ असून सक्रिय सीलबंद इमारती ६३ आहेत.


हे हि वाचा – मुंबईकरांनो ! ऑक्टोबरपर्यंत पाण्याचे नो टेन्शन, विकेंडच्या पावसाची कमाल

First Published on: July 19, 2021 9:14 PM
Exit mobile version