The Quarantine Plan : ‘वर्क फ्रॉम होम आहात’ ? ऋतुजा दिवेकर सांगताहेत आहार, व्यायामाचा आठवड्याचा प्लॅन

The Quarantine Plan : ‘वर्क फ्रॉम होम आहात’ ? ऋतुजा दिवेकर सांगताहेत आहार, व्यायामाचा आठवड्याचा प्लॅन

The Quarantine Plan : 'वर्क फ्रॉम होम आहात' ? ऋतुजा दिवेकर सांगताहेत आहार, व्यायामाचा आठवड्याचा प्लॅन

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक जण संसर्गाचा भीतीने अनेक स्वत:ला फीट ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक घरगुती उपाय, जेवण आणि पोषणयुक्त फळांचा खाण्यात समावेश करत आहेत. स्वत:ला तंदुरुस्त, रोगमुक्त ठेवण्यासाठी वेगवेगळे डाइट प्लान फॉलो करुन घराचा घरी वर्क आऊट करत कोरोना संसर्ग टाळत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे ऑफिसेस किंवा कामाची ठिकाणे बंद असल्याने अनेक जण वर्कफ्रॉम होम करत आहेत.

परंतु वर्क फ्रॉम होम करताना व्यवस्थात बसण्यासाठी जागा नसल्यास किंवा घरी कसेही बसून काम केल्यास पाठीचा त्रास किंवा अंगदुखीसारखी त्रास सतत होत राहतात. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना होणार त्रास आणि आजार दूर करण्यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशियन रुजुता दिवेकर हीने आठवड्याभराचा Quarantine प्लान तयार केला आहे. या प्लानमध्ये घराचा घरी राहून तुम्ही चविष्ट आणि पौष्ठिक जेवण आणि व्यायाम करत कसे कोरोनापासून दूर राहू शकता याची माहिती दिली आहे. यात जेवणात मुख्यत: डाळ, धान्य, बाजरी, आणि ताजा भाज्या आणि फळांचा समावेश करत स्वत:ला कसे फीट ठेऊ शकता असेही रुजुता दिवेकर यांनी सांगितले आहे.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी या Quarantine प्लानमध्ये रुजुताने आठवड्याचा सात दिवसांत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावे यापासून ते कोणता व्यायाम करावा याचाही विस्तृत माहिती दिली आहे. या Quarantine प्लाननुसार प्रत्येक दिवसाचा सुरुवातीला म्हणजे सकाळी भिजत घातलेले बदाम आणि किशमिश खाऊन करावी. कारण बदामाध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन असते आणि किशमिशमध्ये आयरनचे प्रमाण अधिक असते.

नाश्ता कसा असावा ?

आठवड्याचा सात दिवसात रुजुताने सात वेळवेळा नाश्ता सांगितला आहे. यात पोहे, थालीपीछ, इडली सांबर, राजगीरा लाडू, दूध, खाक्रा, कोकी, उपमा अशा पदार्थांचा समावेश आहे.

नाश्तानंतर काय ?

नाश्त्यानंतर तुम्ही काही वेळाने लिंबू सरबत, रसना, चहा, नारळाचे पाणी, आवळा सरबत, कोकम सरबत, लाडू असे पदार्थ खाऊ शकता.

जेवन कसे असावे ?

शक्यतो जेवणात वरण भात, थोड तूप, लोणचं, राजमाचा भात, ओवा घातलेले पराठे आणि दही, आंबोळी लोंच, शाबूदाणा वडे आणि दही. असा एकूण सकाळपासून ते रात्री पर्यंत का खावे आणि कोणता व्यायाम करावा हा हे विस्तृत दिले आहे. तो तुम्ही पाहू शकता.

 

First Published on: May 3, 2021 5:14 PM
Exit mobile version