Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात 500 कोटींचा अपहार; फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण उघडकीस

Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात 500 कोटींचा अपहार; फॉरेन्सिक ऑडिटमुळे प्रकरण उघडकीस

मुंबई : वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या विश्वस्तांनी मूळ संस्थापक विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून वैद्यकीय उपकरणे आणि गरिबांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या निधीतून तब्बल 500 कोटींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप नवनिर्वाचित विश्वस्त मंडळातील कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत केला. फॉरेन्सिक फायनान्शिअल ऑडिट अहवालामुळे जुन्या विश्वस्त मंडळाच्या अपहाराचा भंडापोड झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत विश्वस्त मोहित माथूर, सौरभ शर्मा आणि वकील-सल्लागार असीमही उपस्थित होते. (500 crore embezzlement in Lilavati Hospita)

प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबईत 1978 साली वांद्रे येथे बांधण्यात आलेले लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे पब्लिक ट्रस्ट रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या कामकाजावर धर्मादाय आयुक्त देखरेख करतो. तर रुग्णालयाचे कायमस्वरूपी विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांनी घरातील काही सदस्यांची विश्वस्त म्हणून नेमणूक केली. मात्र नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळातील निकेत मेहता, रश्मी मेहता, भावेन, चेतन मेहता आणि इतर सदस्यांनी मूळ संस्थापक विश्वस्त किशोर आणि चारू मेहता यांना अंधारात ठेवून रुग्णालयाच्या नावाने आलेल्या तब्बल 500 कोटींचा अपहार केला आहे. यात वकील आणि सल्लागारांना फी पोटी 200 कोटी, माहीम आणि लोणावळ्यात तसेच गुजरातमधील पालनपूर येथे मालमत्ता खरेदी अशी अनेक प्रकरणे आहेत. मात्र अशा प्रकारे ट्रस्टच्या पैशाचा गैरवापर करणे कायद्यात बसत नसल्याचेही प्रशांत मेहता यांनी सांगितले.

हेही वाचा –  Goldy Brar Death : अमेरिकेतील गोळीबारात गँगस्टर गोल्डी ब्रारचा मृत्यू; डल्ला-लखबीरने घेतली हत्येची जबाबदारी

ईडी, सीबीआयकडून करणार तपास (ED AND CBI Investigation conducted) 

प्रशांत मेहता यांनी सांगितले की, नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने नुकत्याच केलेल्या फॉरेन्सिक फायनान्शिअल ऑडिट अहवालामुळे जुन्या विश्वस्त मंडळाने केलेल्या 500 कोटी रुपयांच्या अपहाराचे प्रकरण समोर आले आहे. माजी विश्वस्त मंडळाने केलेला हा या शतकातील सर्वात मोठा वैद्यकीय घोटाळा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा ईडी आणि सीबीआयकडून तपास करण्यात यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच अपहार करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून ट्रस्टचा पैसा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नही करू, असेही प्रशांत मेहता स्पष्ट केले.

Edited By – Rohit Patil

First Published on: May 2, 2024 8:43 AM
Exit mobile version