बापरे! गुन्हेगाराला टाकलं उकळत्या तेलात; जाणून घ्या जगातील ७ क्रूर शिक्षा

बापरे! गुन्हेगाराला टाकलं उकळत्या तेलात; जाणून घ्या जगातील ७ क्रूर शिक्षा

जगभरात गुन्हेगारांना वेगवगळ्या शिक्षा दिल्या जातात. काही ठिकाणी तर गुन्हेगारांना उकळत्या तेलात टाकून ठार केलं जातं. अमेरिकेच्या न्यायालयाने अपहरण आणि खून प्रकरणात एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावली. ७० वर्षानंतर अमेरिकेत कोणालातरी मृत्यूदंड ठोठावला आहे. तथापि, अमेरिकेच्या न्यायालयाने ७० वर्षानंतर एखाद्याला फाशीची शिक्षा ठोठावली असली तरीही जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये अशा क्रूर शिक्षेचा मोठा इतिहास आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला जगातील अशा ७ देशांबद्दल सांगणार आहोत, जेथे अशा भयानक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षा – गुन्हेगाराचे शिरच्छेद करणे

देश – सौदी अरेबिया आणि इंग्लंड

१३ व्या शतकात इंग्लंडमध्ये देशद्रोहासाठी भयंकर शिक्षेची तरतूद होती. त्याअंतर्गत गुन्हेगारांना फाशी देऊन त्यांचे शिरच्छेद करण्यात यायचं. एवढंच नव्हे तर गुन्हेगारांचे डोळे बाहेर काढून जाहीरपणे प्रदर्शन केलं जायचं. सौदी अरेबियामध्ये अशा शिक्षेस कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या मते, २०१९ मध्ये सौदी अरेबियामध्ये स्वतंत्र गुन्ह्यासाठी १८४ जणांचे शिरच्छेद करण्यात आले.

शिक्षा – गुन्हेगाराला गोळी मारुन ठार करणे

देश – सोमालिया, गिनी, इराण, उत्तर कोरिया, सौदी अरेबिया

सोमालिया, गिनी, इराण आणि उत्तर कोरियामध्ये अजूनही गोळ्या मारुन गुन्हेगारांना ठार करण्याची तरतूद आहे. चीनमध्येही गुन्हेगारांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार २०१२ मध्ये ६८२ आणि सन २०१३ मध्ये ७७८ जणांना गोळीबार करत ठार केलं.

शिक्षा – जिवंत जाळणे

देश – मोरोक्को, इंग्लंड, आफ्रिकन देश

मध्ययुगीन काळात पुरुष आणि स्त्रियांना देशद्रोहासाठी जाळलं जायचं. बर्‍याच नामांकित व्यक्तींना ही शिक्षा ब्रिटिशांनी १४३१ मध्ये दिली होती. १६०० मध्ये इटालियन वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ ज्योर्दानो ब्रुनो यांना देखील जिवंत जाळण्यात आलं. याशिवाय अनेक देशांमध्ये जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली शिक्षा म्हणून लोकांना जाळण्यात आलं.

शिक्षा – उकळत्या पाण्यात किंवा तेलात टाकणे

देश – इंग्लंड

आठव्या हेनरीच्या कार्यकाळात जेवणातून विष दिलं म्हणून गुन्हेगाराला पहिल्यांदा अशी शिक्षा देण्यात आली होती. १५३१ मध्ये, रोस्टरचा बिशपच्या जेवणात स्वयंपाक करणाऱ्या महिलेने विष टाकलं. त्यानंतर तिला अशी शिक्षा देण्यात आली. तथापि, हा कायदा १५४७ मध्ये रद्द करण्यात आला.

शिक्षा – देशद्रोहाच्या आरोपाखाली फासावर लटकवणे

देश – इंग्लंड

अशा शिक्षेची तरतूद १२४१ मध्ये सुरू झाली. शिक्षा म्हणून, दोषीला घोड्यांना बांधून ओढलं जायचं आणि त्याचा मृत्यू होण्यापूर्वीच त्याची मान कापली जायची. त्यानंतर शरीराचे तुकडे करुन शहराच्या विविध भागात पाठवण्यात आले.

सुळावर चढवणं

देश – रोम

रोमन साम्राज्याविरूद्ध आवाज उठविल्याबद्दल इ.स.पू. ७१ मध्ये ६००० हून अधिक लोकांना सुळावर चढवण्यात आलं. सौदी अरेबियामध्ये २०१३ मध्येही अशीच काही शिक्षा देण्यात आली होती.

शिक्षा – दगडाने ठेचून मारणे

देश – उत्तर आफ्रिका, इराण, इंडोनेशिया, सौदी अरेबिया

प्राचीन प्रथेनुसार आजही बर्‍याच देशांमध्ये गुन्हेगाराला दगडाने ठेचून मारलं जातं. ही शिक्षा विशेषत: उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेत दिली जाते. २०१९ मध्ये समलैंगिक प्रकरणांमध्येही अशी शिक्षा देण्यात आली होती. इंडोनेशिया, सोमालिया, सुदान, नायजेरिया, इराक, पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारे गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद आहे.

 

First Published on: October 26, 2020 5:17 PM
Exit mobile version