अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा पाच महिन्यानंतरही शोध सुरूच

अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा पाच महिन्यानंतरही शोध सुरूच

अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा पाच महिन्यानंतरही शोध सुरूच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात भिवंडीतून एका १६ वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. तरुणीच्या अपहरणानंतर तिच्या कुटुंबियांनी सर्वच ठिकाणी शोध घेतला. मात्र, अद्याप या तरुणीचा शोध लागला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तरुणीच्या घरातील कुटुंबिय तिच्या आठवणीत एक एक दिवस पुढे ढकलत आहेत.

लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच वडील देखील गावी गेले होते. तर आई एका गारमेंट गोदामात मजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवत असतानाच त्यांची १६ वर्षाची मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली. त्यामुळे मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पाच महिने उलटून गेले तरीही बेपत्ता मुलीचा शोध लागला नसल्याचे समोर आले आहे. तिचे कुटूंब चिंतेच्या वातावरणात एक एक दिवस काढत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार; बेपत्ता मुलगी कुटुंबासह राहनाळ गावातील एका इमारतीमध्ये राहते. हे कुटूंब मूळचे उत्तरप्रदेशमधील बनारस शहरानजीक असलेल्या एका गावात राहतात. लॉकडाऊन काळात कामकाज ठप्प असल्याने मुलीचे वडील गावी गेले होते. तर जून महिन्यात काही अंशी भिवंडीतील गोदाम पट्ट्यातील कामकाज सुरु झाले होते. त्यामुळे मुलीची आई संगीता माळी या अंजुरफाटा परिसरात असलेल्या गारमेंट गोदामात कामाला जात होत्या. नेहमीप्रमाणे १५ जून रोजी संगीता या सकाळी कामावर जात असताना घरात त्यांची १६ वर्षीय मुलगी प्रिया आणि लहान मुलगा घरात होते. तर घरानजीकच गोदाम असल्याने त्या दुपारी घरी जेवणासाठी आल्या. त्यावेळी घरात प्रिया आढळून आली नाही. त्यामुळे त्याने तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून येत नसल्याने त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मुलगी प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यादिवसापासून नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख तिचा कसून शोध घेत आहेत.


हेही वाचा – पैठणमध्ये तिहेरी हत्याकांड,९ वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरला


 

First Published on: November 29, 2020 6:41 PM
Exit mobile version