इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी 'बिग बॉस' फेम अभिनेत्री हीना पांचाळला जामीन मंजूर

नाशिकच्या इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हीना पांचळला अटक करण्यात आली आहे. इगतपुरी हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर नाशिक पोलिसांनी अभिनेत्री हीना पांचाळसह २२ जणांना अटक करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री २ च्या सुमारास इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर छापा टाकला. यावेळी हीनासह एका परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

वाढदिवसाच्या पार्टीसाठी या अभिनेत्रीने आपल्या मित्रांसह इगतपुरी गाठली.यानंतर केक कापून पार्टीत उपस्थित सगळ्यांनी अंमली पदार्थ्यांचे सेवन केले. याचवेळी नाशिक पोलिसांनी पार्टीवर धाड टाकली. इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर ही हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती. यावेळी पार्टीतील सर्वच जण हुक्का, ड्रग्सचे सेवन करत नाचगाणी करत होते. दरम्यान  गुप्त माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांना या रेव्ह पार्टीची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वातखाली पोलिसांच्या पथकाने त्या बंगल्यावर धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १० पुरुष आणि १२ महिला अशा २२ जणांना ताब्यात घेतले. तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सध्या या फरार लोकांचा पोलिस तपास घेत आहेत. पोलिसांनी या स्काय व्हिला बंगल्यातील स्टाफला देखील ताब्यात घेतले आहे. या अटक झालेल्या आरोपींमध्ये बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळचा देखील समावेश आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचची कॉपी म्हणून ओळख मिळवणारी डान्सर हिना पांचाळ बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.


 

 

 

First Published on: June 28, 2021 11:01 AM
Exit mobile version