Crime News : ऍण्टॉप हिल परिसरात अल्पवयीन भावा-बहिणीचा मतदेह कारमध्ये सापडला

Crime News : ऍण्टॉप हिल परिसरात अल्पवयीन भावा-बहिणीचा मतदेह कारमध्ये सापडला

मुंबई : ऍण्टॉप हिल येथे सात आणि पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृतदेह कारमध्ये सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साजिद मोहब्बद शेख (7) आणि रिना मोहब्बत शेख (5) अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सख्खे बहिण-भाऊ आहेत. खेळता गायब झालेल्या या दोघांचा शोध सुरू असतानाच जवळच असलेल्या एका कारमध्ये त्यांचे मृतदेह सापडले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर या दोघांच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या दोघांचा मृत्यू कारमध्ये गुदमरल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोहब्बत शेख हे ऍण्टॉप हिल येथे राहत असून त्यांना साजिद आणि रिना नावाचे दोन मुले आहे. बुधवारी ते दोघेही घराजवळ खेळत असताना अचानक गायब झाले. मोहब्बत शेख यांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते दोघेही कुठेही सापडले नाही. त्यामुळे मोहब्बत शेख यांनी ऍण्टॉप हिल पोलिसात तक्रार दाखल केली. दिवसाढवळ्या दोन अल्पवयीन मुले गायब झाल्याने ऍण्टॉप हिल पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना रात्री उशिरा काही अंतराजवळ पार्क केलेल्या कारमध्ये साजिद आणि रिना हे दोघेही बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना तातडीने कारमधून बाहेर काढून सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.

हेही वाचा – Tamanna Bhatia : फेअर प्ले बेटींग ऍपप्रकरणी तमन्ना भाटियाला समन्स; सायबर सेलकडून होणार चौकशी

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ऍण्टॉप हिल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या फुटेजमध्ये काही संशयास्पद दिसते का? याची पाहणी केली, मात्र फुटेजमध्ये पोलिसांना काहीही संशयास्पद दिसून आले नाही. साजिद आणि रिना हे दोघेही खेळता खेळता कारजवळ आले आणि ते दोघेही कारमध्ये लपले होते. नंतर त्यांना कारचा दरवाजा उघडता येत आले नाही. त्यामुळे कारमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतिक्षेत आहे. या अहवालानंतर या दोघांच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान मिसिंग झालेल्या दोन्ही मुलांचा कारमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.

हेही वाचा – Crime : मालाड येथे गटाराची सफाई करताना कामगारांचा मृत्यू; सुपरवायझरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

First Published on: April 25, 2024 11:10 PM
Exit mobile version