Bollywood Drugs Connection: ड्रग्स तस्कर शादाब बटाटा NCB च्या ताब्यात

Bollywood Drugs Connection: ड्रग्स तस्कर शादाब बटाटा NCB च्या ताब्यात

Bollywood Drugs Connection: ड्रग्स तस्कर शादाब बटाटा NCB च्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्स तस्कारात अनके नावे समोर येत आहेत. यातच मुंबईत NCB ने अमली पदार्थ तस्कर फारुक बटाटाचा मुलगा शादाब बटाटा एनसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने तब्बल २ कोटी रुपयांचे ड्रग्स हस्तगत केले आहेत. शादाब बटाटा गेली अनेक वर्षे मुंबई आणि देशभरात ड्रग्स तस्करी करत होता. तसेच बॉलिवूडमध्येही अनेक सेलिब्रिटीला तो ड्रग्स पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंकू पठाणनंतर NCB ची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून NCB बॉलिवूडमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या तस्कारांच्या शोधात आहे. यादरम्यान अनेक ड्रग्स तस्कर बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत असल्याचे समोर आले. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपालचेही नाव समोर आले. याच तपासाचा भाग म्हणून NCB ने गुरुवारी रात्री उशीरा फारूकचा मुलगा शादाब ताब्यात घेतले. यानंतर लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरारोड या भागांमध्ये छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत सुमारे २ कोटी रुपये किंमतीचे MDMA ड्रग्ज जप्तसह अनेक महागड्या गाड्य़ा हस्तगत करण्यात आल्या. याशिवाय एक नोटा मोजण्याचे मशीनही NCB ने ताब्यात घेतले.

फारूख बटाटा देशभरात MDMA ड्रग्स, एलएसडी, गांजा, बड आणि कोकेनसारखं ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीनंतर गुरुवारी दिवसभर एनसीबीकडून या प्रकरणात कारवाई सुरु होती. यामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातल्या ठिकाणांवर एनसीबीनं छापे मारले.


 

First Published on: March 26, 2021 6:47 PM
Exit mobile version