‘तुझ्यासाठी बायकोला घटस्फोट दिला आणि तू मला’, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपलं

‘तुझ्यासाठी बायकोला घटस्फोट दिला आणि तू मला’, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपलं

प्रातिनिधिक छायाचित्र

ज्या प्रेयसीसाठी पत्नीला सोडचिट्ठी दिली त्याच प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिला या कारणावरून संतापलेल्या प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला मारहाण केल्याचा प्रकार कल्याण पश्चिम येथे उघडकीस आला. याप्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रमेश शर्मा (२४, काल्पनिक नाव) असे या प्रियकराचे नाव आहे. रमेश हा डोंबिवलीतील आजदे गाव येथे राहणारा आहे.

रमेश हा विविहीत असून दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. दरम्यान रमेश हा कचोरे गाव येथे राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. परंतु विवाहित असल्यामुळे प्रेयसीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. तुझ्यासाठी मी माझ्या पत्नीला सोडतो असे त्याने प्रेयसीला सांगितले आणि त्याने खरोखर पत्नीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रमेश हा लग्न करण्यासाठी प्रेयसीच्या मागे लागला. शनिवारी तो प्रेयसीचा पाठलाग करत कल्याण पश्चिम येथे असणाऱ्या तिच्या कार्यालयाजवळ गेला आणि तिच्या कार्यालयाच्या खालीच तिचा हात पकडून तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? असे विचारले. भररस्त्यात रमेशने तिचा हात पकडल्यामुळे ती गोंधळून गेली आणि तिने त्याला सरळ नकार दिला.

‘तुझ्यासाठी मी माझ्या पत्नीला सोडले आणि आता तू लग्नाला नकार देत आहे, असे बोलून रमेशने तिला भररस्त्यात मारहाण करू लागला, हा प्रकार बघून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी रमेशच्या तावडीतून या तरुणीची सुटका करून रमेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून रमेश शर्मा याच्याविरुद्ध मारहाण करणे, विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनकर यांनी दिली.

First Published on: October 19, 2020 10:55 PM
Exit mobile version