बाई आणि बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर

बाई आणि बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर

बाई आणि बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर

कल्याण डोबिंवलीमधून एक विचित्र प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून थेट शेतकऱ्याकडून माल उचलून कल्याण बाजारात विकणारा व्यापारी हा चोर बनसल्याची घटना समोर आली आहे. बाई आणि बाटलीच्या नादी लागून चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यापाऱ्याने कल्याण डोंबिवली परिसरात मागील काही महिन्यात ४ ठिकाणी घरफोडया करून चोरीचा पैसा बारबालेवर उडवल्याची माहिती त्याच्या चौकशीत समोर आली आहे.

बबन जाधव असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका खेड्यात आपल्या कुटूंबासह राहत होता. लॉकडाउनच्या काळात बबन जाधव हा इगतपुरी, घोटी आदी परिसरातील शेतकऱ्याकडून भाजीपाला घेऊन कल्याणच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येत होता. दररोज चार ते पाच हजार रुपयांची विक्री करून घरी जाणारा बबन हा मित्रांच्या नादी लागून बियरबार मध्ये जाऊ लागला होता. हळूहळू त्याला बियरबारचा चांगलाच नाद लागला आणि तो भाजीपाला विक्रीतून मिळालेले पैसे बारबालावर उडवू लागला होता. दोन दिवस कल्याणमध्ये मुक्काम ठोकून तिसऱ्या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या बबन जाधव हा पत्नीला धंदा झाला नाही महानगपालिकेने माल उचलून नेला अशी कारणे सांगू लागला होता. घरी पैसे येणे बंद झाल्यामुळे पत्नी आणि मुलांची उपासमार सुरु झाली होती.

बबन शेतकऱ्याकडून उधारीवर भाजीपाला घेऊन कल्याणच्या बाजारात विकत होता. मिळालेले पैसे दारू आणि बारबालेवर उडवत होता. बारवर उडवण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे अखेर बबनने चोरीचा मार्ग अवलंबला. कल्याण डोंबिवली परिसरात त्याने रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यास सुरुवात केली. अखेर तो मानपाडा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांच्या केलेल्या चौकशीत त्याने चार गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरीचा सर्व पैसा त्याने बाई आणि बाटलीवर उधळल्याची कबुली दिल्याने मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.


हेही वाचा – नववर्ष स्वागतासाठी ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त

First Published on: December 29, 2020 9:46 PM
Exit mobile version