दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार

दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार

प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसा ढवळ्या मुलींवर बलात्कार करण्याचे प्रकार रोज घडत आहेत. असाच धक्कादायक प्रकार धुळ्यात घडला आहे. दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे रहायला आलेल्या तरूणीवर गावातील तीन तरूणांनी सामुहिक बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी तरूणीला विष पाजून रस्त्यावर फेकून दिले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.

पीडीत तरूणी ही धुळे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या टोळी या गावात राहत होती. पीडित तरूणी केवळ २० वर्षांची होती. धुळ्यातच ती बीएससीचं शिक्षण घेत होती. दिवाळीची सुट्टी मिळाल्याने तरूणी तिच्या भवासह पारोळा येथे राहणाऱ्या तिच्या मामाच्या गावी आली होती. ७ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास तरूणी औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडली. घराबाहेर पडताच तरूणीला पळून नेत तिच्यावर चार जाणांनी सामूहिक बलात्कार केला. तरूणीने घडलेल्या प्रकाराची माहिती कोणाला सांगू नये यासाठी तरूणीला विष पाजले आणि तिला रस्त्यावर फेकून दिले.

तरूणीच्या मामाने ८ नोव्हेंबरला पोलिसात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी सांयकाळच्या सुमारात मामाला एका तरूणीवर विषबाधा झाली असून तिच्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. मामाने रूग्णालयात जाऊन भाचीची ओळख पटवली. भाचीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यासाठी तरूणीला पुढील उपचारांसाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. धुळ्याच्या रूग्णालयात नेताना रस्त्यात तरूणीला शुद्ध आली होती. तेव्हा तिने आपले अपहरण करून तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच तरूणीने सांगितले. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला.

आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये एका अज्ञात महिलेचाही समावेश आहे असा दावा पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित तरूणीच्या आईने केली आहे. तसेच शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात याव अशी मागणी ही करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुलाने डाउनलोड केलं App, वडिलांच्या खात्यातून ९ लाख गायब; चोरीची पद्धत वाचून धक्का बसेल

 

 

First Published on: November 10, 2020 10:39 PM
Exit mobile version