घात की अपघात; विहिरीत कारसह आढळला मानवी सांगाडा

घात की अपघात; विहिरीत कारसह आढळला मानवी सांगाडा

घात की अपघात; विहिरीत कारसह आढळला मानवी सांगाडा

शेतातील विहिरीत कारसह मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील पंचाळे-पांगरी रस्त्यावरील शेताच्या विहिरीत ही कार आढळली आहे. पांगरी येथील शेतकरी सुधाकर बेदरकर यांच्या शेतातील पन्नास फूट खोल विहिरीत स्विफ्ट गाडी आढळली आहे. विहिरीतुन पाणी येत नसल्यामुळे सुधाकर यांच्या मुलाने विहिरीत डोकावून बघितले. विहिरीत बघितल्यानंतर त्याला कार आढळली. शेतीसाठी विहिरीतुन पाण्याचा उपसा झाल्यामुळे ही कार दिसून आली. ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या कारमध्ये एका व्यक्तीच्या मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी केलेल्या तपासात ही कार काहि महिन्यांपूर्वी बेपत्ता असल्याचे समजले. तसेच मृत व्यक्तीचे नाव संजय आहिरे असे आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात झाला आहे. अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मिळालेली स्विफ्ट कार ही इंदूरची आहे. त्या कारच्या नंबरवरुन त्या कारचा मालक दिनेश तिवारी असल्याची माहिती मिळाली. ते पुण्यात राहत असल्याने इंदुरला वडिलांकडे कार पाठवत होते. कार इंदुरला नेण्याची जबाबदारी संजय आहिरे यांच्याकडे दिली होती. परंतु इंदुरच्या दिशेने जात असताना कारचा टायर फुटला आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार थेट विहिरीत पडली अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली .

कारचालक काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याची आणि कार इंदुरला पोहचली नसल्याची तक्रार कार मालकाने पुण्यातील वाकड पोलिस ठाण्यात केली होती. शेतातील विहिरीत मृतदेह पडून होता याची शेतकऱ्यालाही खबर नव्हती. हंगामी पिकांची शेती करत असल्यामुळे पाण्याचा उपसा सुरु होता. विहिरीतून पाणी येत नसल्याने डोकावून बघितल्यमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

First Published on: January 31, 2021 5:29 PM
Exit mobile version