धक्कादायक! मुंबईतील २१ तरुणाकडे आढळली १० पिस्तुलांसह १२ मॅगजीन, पोलिसांनी केली अटक

धक्कादायक! मुंबईतील २१ तरुणाकडे आढळली १० पिस्तुलांसह १२ मॅगजीन, पोलिसांनी केली अटक

धक्कादायक! मुंबईतील २१ तरुणाकडे आढळली १० पिस्तुलांसह १२ मॅगजीन, पोलिसांनी केली अटक

कोरोना काळात राजधानी मुंबईत गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढतेयं. दरोडा, घरफोडी आणि अंमली पदार्थ, हत्यारांची तस्करी मुंबईत दिवसाढवळ्या सुरु आहे. यात मुंबईच्या गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने शस्त्राचा साठा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. विशेष म्हणजे या २१ वर्षीय तरुणाकडून तब्बल १० पिस्तुल आणि १२ मॅगजीन जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात शस्त्रांचा अवैध्य साठा मुंबईत कशा मागवला गेला हे शोधणे आता मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांच्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड भागात एक २१ वर्षीय तरुण मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने सापळा रचत तरुणास ताब्यात घेतले. या आरोपी तरुणाकडून १० पिस्तुल आणि १२ मॅगझीन ६ लाईव्ह राऊंड्स जप्त करण्यात आली आहेत. या आरोपीचे नाव लखनसिंह असून तो मुळचा मध्य प्रदेशाच्या बरुवानी गावचा रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी लखनसिंह विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लखसिंगचे कुटुंब शस्त्रास्त्र बनविण्याच्या धंद्यात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बरुवानी गावातील बहुतेक लोक शस्त्रे बनवण्याचे काम करतात, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लखनसिंहकडे पिस्तूल विकत घेणासाठी भली मोठी यादी पोलिसांना मिळाली आहे. तसेच एक पिस्तूल तो ३० हजारांना विकत आहे. तो दरमहा १०० हून अधिक बंदूका बनवत मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विक्री करतोय. दरम्यान, एवढ्या मोठ्याप्रमाणातील शस्त्र साठा विकण्यासाठी मुंबईत कोणाकडे आला होता? याची चौकशी सध्या गुन्हे शाखा करत आहे.


India Corona Update: देशाच्या मृत्यूसंख्येत घट, तर ६२ ,४८० नव्या रुग्णांची नोंद


 

First Published on: June 20, 2021 11:49 AM
Exit mobile version