दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच दुकान लुटून मालकाची हत्या

दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच दुकान लुटून मालकाची हत्या

दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच दुकान लुटून मालकाची हत्या

दहिसरमध्ये ज्वेलर्स दुकानात शिरून गोळीबार करत मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओम साईराज ज्वेलर्स या दुकानाचे नाव असून ज्वेलर्स मालक शैलेंद्र रमाकांत (वय ४५) पांडेय यांचा या गोळीबारात मृत्यू झाला. दहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

ग्रे कलरच्या एक्टिव्हावरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्ती बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स दुकानात शिरले. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिन्यांची लुटमार करण्यास सुरुवात केली. यावेळी ज्वेलर्स मालक शैलेंद्र यांनी त्यांना विरोध केला असता या आरोपींनी त्यांचा डोक्यात गोळी झाडत हत्या केली. त्य़ानंतर दुकानातील माल आणि दोन हेवी ट्रँवल बॅग घेऊन पसार झाले.

दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार झाले. मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज

दुकानातून निघाल्यावर एक्टिव्हावरुन पसार होत असतानाचे तिघांचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. या घटनेनंतर आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही गोळीबार फक्त लुटमारीच्या उद्देशाने की, व्यक्तीगत कारणातून हत्या झाली याचा तपास पोलिस घेत आहेत.


 

First Published on: June 30, 2021 3:33 PM
Exit mobile version