पोलीस हवालदार आत्महत्याप्रकरण; पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा

पोलीस हवालदार आत्महत्याप्रकरण; पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा

राहुरी : मुळा धरणाच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार्‍या भाऊसाहेब दगडू आघाव या पोलीस कर्मचार्‍याने सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षकांसह चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत कर्मचारी आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साबळे, सहायक फौजदार निमसे, महिला पोलीस कर्मचारी राऊत (सर्व राजूर पोलीस ठाणे) व भाऊसाहेब शिवाजी फुंदे (अहमदनगर मुख्यालय) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळा धरणाच्या गेटवर असणार्‍या चौकीच्या खोलीत शनिवारी सकाळी १० वाजनेच्या सुमारास ही घटना घडली. मयत आघाव यांचेकडे सापडलेल्या सुसाईड नोटमुळे नगर जिल्हा पोलीस विभागात खळबळ उडाली.

सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार, एक महिला पोलीस व एक पोलीस लेखनिक यांच्याविरुद्ध राहुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर सर्व आरोपी फरार झाले आल्याने त्यांना अटक झाली नाही. दरम्यान, या घटनेबद्दल बीड जिल्ह्यातील नामदेव दगडू लोंढे या सेवा निवृत पोलीस हवलदराने एक ऑडिओ क्लिप मुख्यमंत्री यांचे नावाने तयार केला असून त्यामध्ये आघाव यांचेवर दाखल केलेला गुन्हा, त्यावरून दोन ठिकाणी बेकायदेशीर चौकशी या बाबींचा सविस्तर खुलासा केला आहे.

First Published on: October 3, 2022 12:49 PM
Exit mobile version