कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, तर पाच जणांवर गुन्हा दाखल

कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, तर पाच जणांवर गुन्हा दाखल

कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, तर पाच जणांवर गुन्हा दाखल

कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्ये प्रकरणी एका अटक करण्यात आली असून पाच जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साप्ते यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी मृत राजेश साप्ते यांच्या पत्नी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंकर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत करावाई केली.

कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी वाकड परिसरातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कलाविश्वात एकचं खळबळ उडाली. दरम्यान साप्ते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एत सुसाईट नोट आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये साप्ते यांनी आपल्याला एका युनियनमधील काम करणारे काही व्यक्ती त्रास देत असल्याचे नावानिशी स्पष्ट केले होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी पैशांच्या मागणीसाठी कट रचून साप्ते यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच कामगारांना साप्ते यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यापासून अडवत व्यावसायिक नुकसान करण्याची धमकी देण्यात आली होती. असे मृत राजेश साप्ते यांच्या पत्नी सोनाली साप्ते यांनी आपल्या तक्रारीच म्हटले आहे.

तसेच राजेश यांच्याकडून प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये तसेच वर अधिकचे दहा लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडण्यात आले असेही या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करत वेळोवेळी राजेश यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे पाचही आरोपींच्या आर्थिक फसवणूक, धमक्या आणि जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. . दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांनी नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.


 

First Published on: July 4, 2021 12:53 PM
Exit mobile version