Crime News : रणवीर सिंह डिपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

Crime News : रणवीर सिंह डिपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : सिनेअभिनेता रणवीर सिंह डिपफेक व्हिडीओप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या व्यक्तीच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. (Ranveer Singh deepfake video Case registered )

रणवीर सिंह हा 14 एप्रिल रोजी भारतीय फॅशनला अभिनेत्री क्रिती सेनन याच्यासोबत उत्तरप्रदेशच्या वाराणसी शहरात गेला होता. यावेळी रणवीरची एशियन न्यूज इंटरनॅशनलद्वारे एक मुलाखत घेण्यात आली. त्यात त्याने पवित्र वाराणसीमध्ये झालेल्या परिवर्तबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदीजी का परपज यही था उनका उद्देश यही था की, वो सेलिब्रेट करे आपने रिच कल्चर, हेरिटेज को, हमारी हिस्ट्री को, हमारी लेंगसी को, क्युकी हेम जो भारतवर्ष है, अब मॉडर्निटी की तरह एैसे बड रहे है, इतनी स्पीड से बढ रहे है, पर हमे हमारी रुटस, हमारी कल्चर हेरीटेज ऐ कभी नही भुलना चाहिए असे कथन केले होते.

हेही वाचा – Salman Khan House Firing Case : मुंबई गुन्हे शाखेचे तापी नदी ऑपरेशन यशस्वी; कोणती हत्यारे मिळाली?

या व्हिडीओमधील चलचित्र जसेच्या तसे ठेवून आर्टिफियल इंटेलिजन्स, डेटा स्वॅपिंग, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेजिनन्स बेस स्पिच ओव्हर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रणवीर सिंह यांच्या व्हिडीओचा डिप फेक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. त्यात मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य करून व्होट फोर न्याय, व्होट फोर कॉंग्रेस असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच रणवीर सिंह याच्यावतीने त्याच्या वडिलांनी नोडल सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध 417, 468, 469, 471 भादवीसह 66 डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून वृद्धाची फसवणूक

मुंबई : कारसाठी घेतलेल्या सुमारे पावणेबारा लाखांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वृद्धाच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी अक्षय संतोष सुतार या शोरुमच्या मालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मुलुंड येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांना एक कार खरेदी करायची होती, यासाठी त्यांच्या चालकाने त्यांची अक्षय सुतारशी ओळख करून दिली. अक्षयचे युनिक मोटर्स नावाचे एक कार शोरुम असून तो त्यांना पंधरा दिवसांत कार डिलीव्हरी करून देईल असे त्याने सांगितले. फेब्रुवारी 2024 तक्रारदार वयोवृद्धाने अक्षयची भेट घेऊन नवीन कारबाबत त्याला सांगितले. यावेळी त्याने त्यांना पंधरा दिवसांत मारुती कंपनीची ऍटिंगा सीएनजी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून पावणेबारा लाख रुपये घेतले. मात्र पंधरा दिवसांत त्याने कारची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे ते अक्षयच्या मुलुंड येथील शोरुममध्ये गेले. तिथे त्यांना त्याचे शोरुम बंद असल्याचे दिसून आले.

चौकशीअंती अक्षयने त्यांच्यासह इतर काही लोकांना पंधरा दिवसांत कार देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले, मात्र कोणालाही कारची डिलीव्हरी न करता त्यांची फसवणूक केल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच वयोवृद्ध व्यक्तीने नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगत अक्षय सुतारविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अक्षय हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 23, 2024 11:00 PM
Exit mobile version