धक्कादायक! पैशासाठी पतीने कापले पत्नीचे ओठ आणि नाक

धक्कादायक! पैशासाठी पतीने कापले पत्नीचे ओठ आणि नाक

दारुड्या पतीने दारुसाठी पत्नीकडे पैशाची मागणी केली. मात्र पत्नीने नकार देतातच या दारुड्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीचे ओठ आणि नाका कापल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडली आहे. या हल्लामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेने सदर घटनेची माहिती रुग्णालयात भर्ती होत पोलिसांना दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाबूलाल असे या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती बाबूलालविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

जोधपूरमधील प्रतापनगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी पती बाबूलाल हा दिवसभर दारुच्या नशेत असतो. दरम्यान रविवारीही त्याने दारु पिण्यासाठी माझ्याकडे पैशाची मागणी केली. मात्र तेव्हा पत्नीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. पैशासाठी नकार देताच आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या नाकावर आणि ओठांवर शस्त्राने वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. असल्याची माहिती समोर येत आहे. बाबूलाल याने आपल्या पत्नीपासून वेगळा राहत होता. त्यामुळे पत्नी गेल्या काही दिवसांपासून अन्य एका व्यक्तीसोबत राहत होती. परंतु त्या व्यक्तीचे काही कारणास्तव निधन झाले होते. यानंतर ती पुन्हा पती बाबुलाल सह राहु लागली. मात्र पती बाबुलाल तिला दारुसाठी सतत पैशाची मागणी करत मारझोड करत होता. याचदरम्यान रविवारी रात्रीही त्याने दारुसाठी पत्नीच्या ओठावर आणि नाकावर वार केले. यानंतर पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंपूर्ण घटनेता आता पोलीस अधिक तपास करत आहेत.


 

 

 

First Published on: March 15, 2021 5:34 PM
Exit mobile version