OLXवर स्वस्त मोबाईलचे आमिष दाखवून मारला ४७ हजारांचा डल्ला

OLXवर स्वस्त मोबाईलचे आमिष दाखवून मारला ४७ हजारांचा डल्ला

OLXवर स्वस्त मोबाईलचे आमिष दाखवून मारला ४७ हजारांचा डल्ला

ऑनलाईन फसवणूके प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर मोबाईल देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीला सुमारे 47 हजार रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अब्बास मोहम्मद रजा लालजी आणि हितेश सतीशकुमार सेठी अशी या दोघांची आहेत.

जोगेश्वरी येथे राहणार्‍या तक्रारदारांना काही दिवसांपूर्वी ओएलएक्सवर स्वस्त मोबाईलची जाहिरात वाचण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक होता. त्या क्रमांकावर त्यांनी फोन करुन जाहिरात दिलेला आयफोन खरेदी करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांना मोबाईलचे पूर्ण पेमेंट करण्यास सांगून त्यांना एक अकाऊंट क्रमांक दिला. त्यानंतर त्यांनी या अकाऊंटमध्ये सुमारे 47 हजार रुपये जमा केले. मात्र ही रक्कम जमा करुनही त्यांना मोबाईल मिळाला नाही. आपली फसवणुक केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या पथकातील विजय वगरे, नलावडे, संग्राम जाधव, कांबळी यांनी आरोपींचा शोध सुरु केला. ही शोधमोहीम सुरु असतानाच या पथकाने अब्बास लालजी आणि हितेश सेठी या दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांनी गुह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघांकडून पोलिसांनी तीन महागडे मोबाईल, दोन चेकबुक, सहा बँकेचे एटीएम जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेने इतर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


हेही वाचा – गांजा, चरस तस्करीप्रकरणी ड्रग्ज पेडलरला अटक, सव्वातीन लाखांची रोकड हस्तगत

 

 

First Published on: December 26, 2020 8:41 PM
Exit mobile version