ती हाडे श्रध्दाचीच, फॉरेन्सिक चाचणीत खुलासा

ती हाडे श्रध्दाचीच, फॉरेन्सिक चाचणीत खुलासा

संग्रहित छायाचित्र

वसईतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. फॉरेन्सिक तपासात श्रद्धाच्या हत्येची पुष्टी झाली आहे. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पोलिसांनी दिल्लीच्या महरोलीच्या जंगलातून जी हाडं जप्त केली, ती हाडं आणि ब्लड क्लॉट आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए नमुना जुळला आहे.

फॉरेन्सिक विभागाला संपूर्ण अहवाल तयार करून तो देण्यास काही दिवस लागू शकतात, असे बोलले जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांच्या तपासणीनंतर श्रद्धाची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी फॉरेन्सिक टीमने पोलिसांना सांगितले की, त्यांना करवतीने मृतदेह कापल्याच्या खुणा आढळल्या आहेत. अशा स्थितीत पोलीस आता पुढील कारवाईसह सविस्तर अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.

या भीषण हत्येचा सध्या वेगाने तपास सुरू आहे. ताज्या अपडेटनुसार, आरोपी आफताबची दोनदा पॉलीग्राफ चाचणी झाली आहे. यात त्याची सुमारे 19 तास चौकशी करण्यात आली. आफताबला जवळपास 40 प्रश्न विचारण्यात आले. मात्र आफताबने अद्याप या हत्याकांडाशी संबंधित संपूर्ण सत्य सांगितले नाही. आज आफताबची पोलिस कोठडीही संपत आहे. अशा परिस्थितीत त्याची पुन्हा एकदा पॉलीग्राफ चाचणी घेण्यासोबतच न्यायालयाकडून त्याच्या रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.


तिथेच सणसणीत कानाखाली का नाही दिली?; राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल

First Published on: November 26, 2022 11:31 AM
Exit mobile version