धक्कादायक! घटस्फोटीत पत्नीनेच केली काळी जादू; उपचारासाठी लागतील ६ लाखांची कबुतरे!

धक्कादायक! घटस्फोटीत पत्नीनेच केली काळी जादू; उपचारासाठी लागतील ६ लाखांची कबुतरे!

Aurangabad Shocking Superstition mother tries to burn her own daughter

देवावर तसेच विज्ञानावर विश्वास न ठेवता कित्येकदा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याला बळी पडल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आहेत. आजच्या २१ व्या शतकात देखील अनेकजण जादूटोणा, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवतात, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. सतत आजारी असणाऱ्या व्यक्तीवर घटस्फोटीत पत्नीने काळी जादू केली असून त्यातून बाहेर पडायचे असल्यास तब्बल सहा लाखांची कबुतरे लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भोंदूबाबावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करणाऱ्या अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे २०१० मध्ये गुजरातमधील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. परंतु, पत्नीपासून मुल होत नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये संमतीने घटस्फोट घेतला. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी हुझेफा याला ताप आला होता. ताप आल्यामुळे कोरोनाची लागण झाली असावी, असा घरातील मंडळींचा अंदाज होता. त्यामुळे त्याच्या घरातल्या सदस्यांनी त्याला कोरोनाची तपासणी करण्यास सांगितली. मात्र, तपासणीत अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अनेकदा उपचार करुनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक होण्याकरता अल्लाकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत सांगितले.

पत्नीने केली काळी जादू?

दरम्यान, सैफुदीन यांनी अल्लाकडे प्रार्थना केली. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला. त्यास हुझेफाच्या आजारपणाबाबत सांगितले असता त्याने मी तुमच्या घरी येऊन मुलास पाहतो, असे सांगितले. त्यानुसार हकिमउद्दीन एका माणसाला घेऊन हुझेफा याच्या घरी गेला. त्यावेळी त्यांनी मांत्रिक उपचार करुन हुझेफाच्या पत्नीचा फोटो पाहण्यास मागून तो पाहत राहिला आणि त्याने दुसऱ्या दिवशी कुटुंबियांना भेटण्यास बोलावले. भेटल्यावर हुझेफाच्या पत्नीनेच त्याच्यावर काळी जादू केल्याचे सांगितले आणि त्यामुळे त्याला त्रास होत असल्याचे म्हणाला. तसेच तो मरणाच्या दरात असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो, असे सांगून घरातील आणखी दोन जणांना या काळ्या जादूचा फटका बसणार असल्याचे सांगितले.

हा आहे उपाय?

भोंदूबाबाने त्यावर उपाय सांगितला की, “मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ही कबुतरे काळ्या जादूचा त्रास कमी करण्यास मदत करतात. याकरता चार कबुतरे लागणार असून यासाठी ६ लाख ८० हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाचे वडिलांनी बँक खात्यातून पैसे काढून दिले”. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


हेही वाचा – प्रेम पडलं महागात; पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीला ऑफिसमधूनच उचलले


 

First Published on: January 20, 2021 7:02 PM
Exit mobile version