सोनं तस्करीसाठी लढवली भन्नाट शक्कल, चक्क गिळल्या १६१ सोन्याच्या कॅप्सूल

सोनं तस्करीसाठी लढवली भन्नाट शक्कल, चक्क गिळल्या १६१ सोन्याच्या कॅप्सूल

सोनं तस्करीसाठी लढवली भन्नाट शक्कल, चक्क गिळल्या १६१ सोन्याच्या कॅप्सूल

सोन्याची तस्करी करण्यासाठी नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवली जाते. तस्करी करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विविध मार्गांनी सोन्याची तस्करी केली जाते. आजवर अनेक ठिकाणी सोन्याच्या तस्करीचे प्रकार उघड झाले आहेत. चेन्नईत पकडण्यात आलेल्या स्मगलर्सकडून सोन्याची तस्करी करण्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी स्मगलर्सनी एक भन्नाट शक्कल लढवली. ती पाहून पोलिसही हैराण झाले. स्मगलर्सनी चक्क सोन्याच्या कॅप्शुल्स गिळल्याचा एक धक्कदायक प्रकार रविवारी चेन्नई विमानतळावर समोर आला आहे. स्मगलर्सनी चक्क १६१ सोन्याच्या कॅप्सूल्स गिळल्या होत्या. सोन्याची तस्करी करण्याचा हा वेगळा प्रकार पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. या प्रकारात एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २२ जानेवारी रोजी दुबई आणि शेरजाह येथून आलेल्या काही प्रवाशांना एअर इंटेनिजेन्स युनिटला त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यांना बाहेर जाताना अडवले होते असे चेन्नई कस्टमने सांगितले आहे.

अंदाजे २.१७ करोड रुपयांचे ४.१५ किलो सोने पोलिसांच्या हाती लागले आहे. हे सोने तस्करीचा भाग असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांनी पॉलिथिन किंवा रबराचे आवरण असलेल्या सोन्याच्या पेस्ट कॅप्सूल गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांना प्रवाशांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सातही जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी सोन्याचे कॅप्सूल पोटात आणि गुदाशयात लपवून ठेवल्याचे कबूल केले. प्रवासाला निघण्यापूर्वी आम्ही सोन्याचे कॅप्सूल गिळले होते, असे त्यांनी सांगितले. गिळलेले कॅप्सूल पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना स्टॅन्लेच्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आठ दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोन्याचे स्मगलींग करणाऱ्या स्मगलर्सकडून पोलिसांनी २.१७ करोडचे ४.१५ किलो सोने जप्त केले. यात १.२८ करोड आणि १६१ सोन्याच्या कॅप्सूल्स जप्त केल्या. ५१.३६ लाख रुपयांचे १८ किलोच्या सोन्याचे ६१ कॅप्सूल्सचे बंडल्स पोलिसांकडून जप्त करण्यात आले. ३०.६४ लाखाच्या ३ सोन्याच्या चेन, ८ सोन्याचे तुकडे, सोन्याच्या ८ अंगठ्या आणि सोन्याचे दोन बंडल्स जप्त करण्यात आले. हे सर्व सोने ते मोठ्या हॅन्ड बॅग्ज आणि पाकिटामधून घेऊन जात होते असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – प्लेसमेंट एजन्सीचा धक्कादायक कारभार, नोकरीच्या बाहण्याने मुलींची तस्करी

First Published on: February 2, 2021 11:05 AM
Exit mobile version