धावत्या ट्रेनखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोदींकडे व्यक्त केली इच्छा

धावत्या ट्रेनखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोदींकडे व्यक्त केली इच्छा

धावत्या ट्रेनखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोदींकडे व्यक्त केली इच्छा

आयुष्यात अनेक स्वप्न उराशी बाळगून आपण प्रयत्न करत असतो. मात्र काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची स्वप्न ही स्वप्नचं राहतात. मात्र काहीही झाले तरी स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयाने आपण धडपडत राहतो अशावेळा पदरी निराशा येते. त्यामुळे अनेक जण हार मानत आत्महत्येपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलतात. ग्वालियरमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. १६ वर्षीय तरुणाने एक स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले मात्र वेळोवेळी अपयश पदरी पडल्याने त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

या तरुणाचे चांगला डान्सर होण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण होऊ न शकल्याने त्याने आत्महत्या केली. मात्र आत्महत्येपूर्वी तरुणाने एक सुसाईट नोट लिहिली होती. सुसाईट नोटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींनी माझी अखेरची इच्छा पूर्ण करावी असे त्याने नोटमध्ये म्हटले आहे. सुसाईट नोटमध्ये त्याने गायक अरिजीत सिंहने गायलेली गाणी आणि नेपाळी कलाकार सुशांत खत्री यांनी कोरियोग्राफ केलेल्या डान्सचा म्युझिक व्हिडिओ बनवावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.

सुसाईट नोटमध्ये तरुणाने लिहिले की, मृत्यूनंतर एक म्युझिक व्हिडिओ बनवला जावा, त्यात एक गाणं अरिजीत सिंह आणि नेपाळी कोरिओग्राफर सुशांत खत्रीने डान्स करावा. या म्युझिक व्हिडिओमुळे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तरुणाने ही शेवटची इच्छा पूर्ण करणयाची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मात्र तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे. डान्सर बनण्याचे स्वप्न पूर्ण न करु शकल्याने मुलाने आत्महत्याचे पाऊल उचलले हे वाचून त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

यावर झांसी रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी संजीव शर्मा यांनी सांगितले की, ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील ११ वीत शिकणाऱ्या एका युवकाने रविवारी रात्री रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. या तरुणाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली. ज्यात त्याने, एक उत्कृष्ठ डान्सर बनू शकलो नाही कारण माझ्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी मला साथ दिली नाही असे लिहिले आहे.


Black death: जगावर पून्हा ‘ब्यूबोनिक प्लेग’ महामारीचे संकट, रशियन डॉक्टरांचा इशारा


First Published on: October 12, 2021 2:22 PM
Exit mobile version