चोराचा आत्मविश्वास तर बघा; मालकाकडूनच चावी मागून बाईक चोरी करायचा

चोराचा आत्मविश्वास तर बघा; मालकाकडूनच चावी मागून बाईक चोरी करायचा

काही दिवसांपूर्वी OLX वर एकच कार अनेक वेळा विकल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. आता अशीच विचित्र घटना झारखंडमधून समोर आली आहे. झारखंडमधील जामताडा येथे एक चोर मालकाकडून बाईक मागायचा आणि ती बाईक घेऊन पलायन करायचा. जामताड पोलिसांनी या चोराला पकडले असून त्याच्याकडून अनेक मोटार सायकल जप्त केल्या आहेत. चोराच्या चोरी करण्याच्या स्टाईलने पोलीस देखील हैराण झाले.

बाईक चोर मोठ्या दुकानात जायचा आणि दुकानदाराला खरेदीची मोठी यादी द्यायचा. दुकानदार सर्व सामान देऊन झाल्यावर बिल द्यायचा. तेव्हा हा चोर दुकानदारांना पॉकेट घरी विसरलो असे सांगायचा. त्यानंतर दुकानदाराशी गोड बोलून त्यांच्याकडून गाडी मागायचा आणि घरुन पैसे आणतो सांगायचा. मोठ्या प्रमाणात विक्री होतेय या विचारात दुकानदार देखील त्या चोराकडे आपल्या बाईकची चावी द्यायचे. त्यानंतर हा चोर बाईक घेऊन पलायन करत असे, तो काही परत त्या दुकानदाराकडे येत नसे. चोरलेली बाईक तो अब्दुल वकीलच्या गॅरेजवर पोहोचवीत असत.

या प्रकरणाची माहिती देताना आयपीएस शुभांशू जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक बाईक चोरल्याच्या घटना समोर येत होत्या. या घटनांमध्ये हा चोर अनोख्या पद्धतीने चोरी करीत होता. या चोराला कोणी ओळखू नये यासाठी हा चोर आपला चेहरा मास्कने लपवायचा. दरम्यान, पोलिसांनी चोरासह गॅरेजच्या मालकालाही ताब्यात घेतले आहे. चोराकडून चोरी केलेल्या बाईक जप्त केल्या आहेत.

 

First Published on: November 20, 2020 4:51 PM
Exit mobile version