फटाक्यांवरून झाले भांडण, मुलाला वाचवायला गेलेल्या आईने गमावले प्राण

फटाक्यांवरून झाले भांडण, मुलाला वाचवायला गेलेल्या आईने गमावले प्राण

फटाक्यांवरून झाले भांडण, मुलाला वाचवायला गेलेल्या आईने गमावले प्राण

यंदा दिवळीत फटाके फोडण्याला बंदी घालण्यात आली होती. असे असले तरी लोकांनी सरकारच्या नियमांना छेद देत फटाके फोडले. फटाक्यांमुळे झालेले अनेक अपघात आपण पाहिले आहेत. परंतु उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेमुळे एका आईला तिचा जिव गमवावा लागला आहे. मुलाने लावलेल्या फटाक्यांमुळे दुकानदाराशी भांडण झाले. या भांडणात दुकानदाराने मुलाला बेदम मारहाण केली. मुलाला सोडवायला गेलेल्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर आईची प्रकृती ढासळली. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात नेताच डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले.

उत्तर प्रदेशमधील झूंडा या गावात ही घटना घडली आहे. इथे राहणारा करण नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत फटाके लावण्यासाठी बाहेर गेला. मुलगा फटाके फोडताना त्यातील एक फटाका समोर असलेल्या दुकानात शिरला आणि दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. दुकानदाराने रागाच्या भरात मुलाला मारहाण करायला सुरूवात केली. मुलाला मारहाण करताना पाहिल्यावर मुलाची आई मीना भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली. मुलाच्या मारहाणीत आईलाही मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांवरून झालेल्या भांडणानंतर करण त्याची मीना आणि दुकानदार आपापल्या घरी निघून गेले. वातावरण पूर्णपणे शांत झाले होते. त्यानंतर अचानक मुलाच्या आईचे डोके दुखू लागले. मुलाने जवळच्या मेडिकलमधून आईला डोकेदुखीची गोळी आणून दिली. गोळी घेतल्यानंतरही महिलेला बरे वाटले नाही. त्यामुळे महिलेला जैथरा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलेचा मृतदेह पोस्टमर्टमसाठी देण्यात आला आहे. पोस्टमर्टम रिपोर्टनंतर महिलेच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ठाण्यात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, १२ लाखांच्या नोटा जप्त!

First Published on: November 19, 2020 7:23 PM
Exit mobile version