लॉकडाऊनमुळे निर्यात क्षेत्रावर संकट; दीड कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड येणार

लॉकडाऊनमुळे निर्यात क्षेत्रावर संकट; दीड कोटी नोकऱ्यांवर कुऱ्हाड येणार

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतातील निर्यात क्षेत्रातील ५० टक्के करार रद्द झाल्यामुळे पुढील काही दिवसांत दीड कोटी नोकऱ्या नष्ट होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने (FIEO) सांगितले की, नोकऱ्या जाण्यासोबतच नॉन परफॉर्मिंग असेट्स देखील वाढण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.

FIEO चे अध्यक्ष शरद कुमार सराफ म्हणाले की, निर्यातदारांना खूप कमी ऑर्डर मिळत आहे. जर कारखानदारांना काम चालू करण्याची परवानगी मिळाली नाही, तर निर्यात वेळेवर करण्यात येणार नाही. निर्यात बंद झाल्यामुळे त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागतील.

तसेच काही आघाडीच्या निर्यातदारांनी शुक्रवारी सरकारकडे निर्यात क्षेत्राला पॅकेज देण्याची मागणी केली आहे. FIEO पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे निर्यातीसाठी लागण्याऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याची मागणी केली आहे. अर्थातच हे करत असताना कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टंस आणि सुरक्षा पाळण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: April 11, 2020 1:46 PM
Exit mobile version