दिलासादायक! वर्षाअखेरीस येणार कोरोनाची लस; WHO ने वर्तवला अंदाज

दिलासादायक! वर्षाअखेरीस येणार कोरोनाची लस; WHO ने वर्तवला अंदाज

कोरोना लस

देशासह जगात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून अजूनही कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी कोरोना विषाणूवर विविध देशांमध्ये सुरू असलेल्या लसीच्या चाचण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नागरिकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत असून लसीच्या चाचण्यांबाबत महत्त्वाची बाब सांगितली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाच्या १० लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. यापैकी कोणती ना कोणती लस २०२० च्या अखेरपर्यंत किंवा २०२१ च्या सुरुवातीला या लस यशस्वीपणे नोंदणीकृत होईल, अशी माहिती WHO ने दिली आहे.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ७७ लाख २४ हजार ०७३ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत जगभरात १० लाख ७८ हजार ४४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ७१ लाख ७५ हजार ८८१ इतका झाला असून यापैकी ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण कोरोना सक्रिय आहेत. तसेच ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत भारतात कोरोनामुळे १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीला बजावली कारणे दाखवा नोटीस

First Published on: October 13, 2020 10:36 PM
Exit mobile version