जहाजाला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू

जहाजाला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू

आग लागलेले जहाज

रशियाच्या सीमाअंतर्गत असलेल्या मालवाहक जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. याघटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या जहाजामध्ये नैसर्गिक वायू आणि गॅसचे साठे होते. अद्याप आगीचे कारण स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या जहाजामध्ये भारतीय, तुर्की आणि लिबियन क्रू उपस्थित होते. जहाजातील माल दुसऱ्या जहाजावर हलवते वेळी हा अपघात झाला आहे. या जहाजावर तंझानियचा झेंडा होता. एका जहाजात १७ क्रू मेंबर होते. यामध्ये नऊ तुर्की आणि आठ भारतीय नागरिक होते. दुसऱ्या जहाजात १५ क्रू मेंबर्स होते. “भारतीय दुतावासाने मॉस्को येथील दुतावासाशी संपर्क साधला आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.”, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

१२ जणांना वाचवले

जहाजाला आग लागल्याची घटना रशियाच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर धुराचे लोट उठले. याची माहिती मिळल्यावर सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या मदत कार्यानंतर १२ जणांना वाचवण्यात आले आहे. जहाज पूर्णपणे जळाल्यामुळे आगीचे खरे कारण स्पष्ट झाले नाही.

First Published on: January 22, 2019 4:01 PM
Exit mobile version