इराकमध्ये अमेरिकन दूतावासावर १२ बॅलेस्टिक मिसाईल्सने हल्ला

इराकमध्ये अमेरिकन दूतावासावर १२ बॅलेस्टिक मिसाईल्सने हल्ला

इराकच्या उत्तरेकडील शहर असलेल्या इरबिल येथे अमेरिकन दूतावासावर रविवारी १२ मिसाइल्सचा वापर करत हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटनाही समोर आली आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला शेजारील देश असलेला इराणमधून करण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने दावा केला आहे की, या हमल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच कोणतीही मोठी झळ या हल्ल्याने बसलेली नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनुसार कोणतीही जिवित हानी या हल्ल्यात झालेली नाही. पण हा हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुतावासाचे नुकसान झाले आहे. या घटनेची चौकशी इराककडून करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार अमेरिकेने अपमानजनक हल्ल्याची निंदा केली आहे.

इराणकडून बदला घेण्याचा प्रयत्न
इराकच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा हल्ला सीरियाच्या गेल्या काही दिवसातील हल्ल्यानंतर अनेक दिवसांनी झाला आहे. दमिश्क येथे झालेल्या झालेल्या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे दोन सदस्य मारण्यात आले होते. इराणच्या विदेश मंत्रालयाने या हल्ल्याची निंदा करतानाच बदला घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर अमेरिकन वाणिज्यिक दूतावासानजीक असणार सॅटेलाईट प्रसारण चॅनेल कुर्दिस्तान २४ ने हल्ल्यानंतरची परिस्थिती दाखवली होती. त्याठिकाणी स्टुडिओत काचा पडलेल्या दिसल्या. तसेच अनेक ठिकाणी मलबा कोसळलेलाही दिसला होता.

इराकमध्ये अमेरिकेची ढवळाढवळ ही गेल्या अनेक दिवसांपासून इराणला खटकते आहे. जानेवारी २०२० मध्ये बगदाद एअरपोर्टवर झालेल्या अमेरिकन ड्रोन हल्ल्यानंतर तणाव आणखी वाढला होता. या हल्ल्यात इराणच्या मुख्य जनरलचा मृत्यू झाला होता. या कारवाईच्या विरोधात इराणने अल असद एअरबेसवर अनेक मिसाइल डागल्या होत्या. अमेरिकन सैनिक असलेल्या ठिकाणी हा हल्ला झाला होता. स्फोटात १०० हून अधिक सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते.


 

First Published on: March 13, 2022 10:32 AM
Exit mobile version