लोखंडी स्क्रॅपमधून साकारला मोदींचा १४ फूटी पुतळा; बाप-बेट्याची कमाल

लोखंडी स्क्रॅपमधून साकारला मोदींचा १४ फूटी पुतळा; बाप-बेट्याची कमाल

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील तेनाली शहरातील कलाकारांनी स्क्रॅप लोखंडापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १४ फूटी उंच पुतळा बनवला आहे. सध्या याच पुतळ्यांची जोरदार चर्चा होत आहे. कारागीर बाप-बेट्याची जोडी कटुरी वेंकटेश्वर राव आणि रविचंद्र हे दोघे तेनाली शहरात ‘सूर्य शिल्प शाळा’ चालवतात. हे दोन्ही पिता-पुत्र लोखंडी स्क्रॅपपासून म्हणजेच नट आणि बोल्टद्वारे रद्दीपासून शिल्प बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. स्क्रॅपमधील लोखंडापासून मूर्ती बनवण्यास आपली आंतरराष्ट्रीय ओळख आहे. गेल्या १२ वर्षांपासून सुमारे १०० टन लोखंडी स्क्रॅप वापरून कलात्मक शिल्प बनवले असल्याचे कटुरी वेंकटेश्वर राव यांनी सांगितले आहे.

त्यांनी पुढे असेही सांगितले की, अलीकडेच आम्ही विश्वविक्रमासाठी ७५ हजार नट वापरून महात्मा गांधींची १० फूट उंचीची मूर्ती तयार केली आहे. हे पाहून बंगळुरूस्थित एका संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा बनवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान मोदींचा पुतळा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ साहित्याचा वापर करण्यात आला असून साधारण दोन महिने १० ते १५ कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.

एका दशकाहून अधिक काळापासून स्क्रॅप लोखंडापासून शिल्प राव बनवत आहेत. सिंगापूर, मलेशिया आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये त्यांच्या लोखंडी स्क्रॅप शिल्पांचे प्रदर्शन देखील भरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही नरेंद्र मोदीजींची मूर्ती लोखंडी स्क्रॅपपासून साकारली आहे. अनेक लोक ज्यांनी हे काम पाहिले आहे ते आमचे कौतुक करत आहेत.


Medicines from Sky: आता ड्रोनने होणार कोरोना लसीची डिलिव्हरी; ICMR ला मिळाली मंजुरी
First Published on: September 14, 2021 7:33 PM
Exit mobile version