जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत चैन्नईच्या १४ वर्षीय प्राग्नाने जिंकले सुवर्णपदक

जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत चैन्नईच्या १४ वर्षीय प्राग्नाने जिंकले सुवर्णपदक

जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत चैन्नईच्या प्राग्नाने अंडर-१८ गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आर. प्राग्ना वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अंडर-१८ ओपन गटातील स्पर्धेत बाजी मारली. १४ वर्षीय ग्रँड मास्टर प्राग्ना याने ११ वा आणि शेवटचा राऊंड हा जर्मनीच्या वालेनटिन बुकेल्सच्या विरोधात खेळला. हा राऊंड ड्रॉ झाला. नंतर ९ अंकांनी प्राग्नाने सरशी करत विजय मिळवला. भारताने या सुवर्ण पदकासह आणखी सहा पदके जिंकली आहेत.

भारताने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तब्बल सहा पदकांची कमाई केली. त्यामुके तीन रौप्य पदकांचा समावेश आहे. भारताला १६ वर्षाखालील मुलींच्या गटात दिव्या देशमुख आणि रक्षिता रवी यांनी भारताला दोन पदके मिळवून दिले. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या दिव्याने विजय मिळवत रौप्यपदक मिळवले. रक्षिताने एरडेने मुंगुंझुलला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. या गटात कझाकस्तानच्या मेरूएर्ट कमालीदेनोवाने सलग पाच विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

First Published on: October 13, 2019 12:05 PM
Exit mobile version