पगार मागितला म्हणून त्याने केली तिची हत्या

पगार मागितला म्हणून त्याने केली तिची हत्या

आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनी केली मुलीची हत्या

मृतदेहाचे तीन तुकडे करुन फेकले नाल्यात

घरकामाचा पगार मागितला म्हणून दिल्लीमध्ये १६ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर या मुलीच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते नाल्यात फेकण्यात आले. दिल्लीतील मियांवालीनगर येथे ही धक्कादायक घटना घडलीय. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मनजीत कारकेता याला अटक केली आहे. दोन जणांच्या मदतीने मुलीची हत्या करण्यात आल्याची कबुली मनजीत याने दिली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

सापळा रचून आरोपीला केली अटक –

दिल्ली पोलिसांना ४ मे रोजी एका नाल्यामध्ये मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला. मियांवालीनगरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या परिसरामध्ये २०० घरं आहेत. मुलीच्या हत्येनंतर या परिसरात रहाणारा झारखंडचा रहिवाशी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित आरोपीच्या गावातील घरावर छापा टाकला मात्र तो त्या ठिकाणी सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना संशयित आरोपी १७ मे रोजी दिल्लीतील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपी मनजीत कारकेताला अटक केली.

नोकरीचे आमिष दाखवून मुलींना आणत होता दिल्लीत –

संशयित आरोपी मनजीत कारकेता याची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये आरोपीने हत्येची कबूली दिली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. झारखंडमधील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून दिल्लीला घेऊन यायचा. हत्या करण्यात आलेल्या मुलीला मनजीतने तीन वर्षापूर्वी दिल्लीत आणले होते. त्यानंतर तिला एका ठिकाणी घरकामासाठी ठेवले. मनजीत दरमहिन्याला या मुलीच्या कामाचे वेतन घ्यायचा त्याबदलात तिला एक रुपयाही देत नव्हता. या मुलीने एका वर्षापूर्वी काम करणे थांबवले. ३ मे रोजी मुलीने मनजीतकडे पगाराची मागणी केली. रागाच्या भरात येऊन मनजीतने तिची हत्या केली. त्यानंतर दोन साथिदारांच्या मदतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते नाल्यात टाकले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

First Published on: May 21, 2018 12:54 PM
Exit mobile version