लठ्ठपणामुळे होणाऱ्या नवऱ्याने सोडून दिलं, आज आहे देशातली सर्वात सुंदर महिला

लठ्ठपणामुळे होणाऱ्या नवऱ्याने सोडून दिलं, आज आहे देशातली सर्वात सुंदर महिला

लठ्ठपणामुळे होणाऱ्या नवऱ्याने सोडून दिलं, आज आहे देशातली सर्वात सुंदर महिला

शरीराचा लठ्ठपणा हा आरोग्याला घातक तर असतोच पण,अनेकदा नात्यांमध्येही यामुळे दुरावा येऊ शकतो. लठ्ठपणामुळे अनेक महिलांचे साथीदार त्यांना सोडचिट्ठी देतात. त्यामुळे त्या महिला खचून जातात. लिनकोलनशायर(Lincolnshire) देशातील अलकेबी(Ulceby) शहरात राहणाऱ्या २६ वर्षीय जेनिफर एटकिन(Jennifer Atkin) सोबत सुद्धा असेच घडले. वाढत्या वजनामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला सोडचिठ्ठी दिली. पण तिने खचून न जाता वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. जिममध्ये मेहनत करून जेनिफरने २ वर्षात १०० पाऊंड म्हणजेच जवळपास ४६ किलो इतके वजन कमी केले. प्रचंड मेहनतीनंतर जेनिफर आज मिस ग्रेट ब्रिटेन २०२०(Miss Great Britain 2020) बनली असून आता ती ब्रिटेनमधली सर्वात सुंदर महिला म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

होणाऱ्या नवऱ्याने सोडल्यानंतर जेनिफरने हार मानली नाही. यानंतर, जेनिफरने तिच्या आहारावर नियंत्रण ठेवले आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास सुरवात केली. जिममध्ये वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. त्यामुळेच आज ती मिस ग्रेट ब्रिटन 2020 झाली आहे. जेनिफर म्हणतो की, तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.

ती म्हणते, “माझ्या आधीच्या आणि आजच्या जीवनात दिवस आणि रात्र यांचा फरक आहे. मी माझ्या अन्नात काही बदल केले आहेत, परंतु आजही मला खाण्याची आवड आहे. मी व्यायामासाठी आठवड्यातून 5 वेळा जिममध्ये जाते. हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

 

First Published on: February 28, 2020 7:20 PM
Exit mobile version