संसदेतील १७ खासदारांना कोरोना; मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडेंचा समावेश

संसदेतील १७ खासदारांना कोरोना; मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडेंचा समावेश

भारतीय संसद भवन

संसदेच्या विशेष पावसाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत हे अधिवेशन पार पाडले जात आहे. अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्यामुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे. संसदेच्या १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये मिनाक्षी लेख, अनंतकुमार हेगडे आणि परवेश साहेब सिंह यांचा समावेश आहे. तसेच सुखबीर सिंह, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्‍वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्‍यपाल सिंह या खासदारांचाही कोरोना संसर्ग झालेल्या यादीत समावेश आहे. त्यामुळे हे खासदार अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे समजते.

देशभरात कोरोनाचा संसर्ग असताना सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभा सकाळी ९ ते १ आणि लोकसभा दुपारी ३ ते ७ अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहे वापरली जाणार आहेत. म्हणजे लोकसभेचे कामकाज सुरू असताना लोकसभेचे खासदार राज्यसभेतही बसलेले आढळतील. तर राज्यसभेचे खासदार लोकसभा सभागृहात बसतील.

हेही वाचा –

खासगी डॉक्टरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

First Published on: September 14, 2020 4:31 PM
Exit mobile version