१७ खासदारांना कोरोनाची लागण

१७ खासदारांना कोरोनाची लागण

भारतीय संसद भवन

मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण १७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आज खासदारांनी अटेंडन्स अ‍ॅपद्वारे हजेरी लावली. तसंच त्यांना कोरोना किटही देण्यात आले. मास्क सॅनिटायझर देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचे आवरणही लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर उभे राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता.

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान आत्तापर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ७८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा देशभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

First Published on: September 15, 2020 6:51 AM
Exit mobile version