आईलाच झाडूने बडवणारा नालायक मुलगा

आईलाच झाडूने बडवणारा नालायक मुलगा

आईला झाडूने बडवणारा मुलगा (फोटो सौजन्य- टाइम्स ऑफ इंडिया)

लहान मुले अभ्यास करत नाहीत किंवा खूप मस्ती करतात त्यामुळे पालकांना त्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली असते. मुलगा वाईट वळणारा जाऊ नये यासाठी आई वडिल समजवतात किंवा वेळे प्रसंगी मुलाला बदडूनही काढतात. यामध्ये मुलाचे चांगले व्हावे हा उद्देश असतो. मात्र आपल्या शेजाऱ्यांसमोर ओरडले याचा राग मनात ठेऊन एका मुलानेच आईला झाडूने बदडून काढल्याची घटना बंगळुरू येथे घडली आहे. आईला झाडूने बडवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडित आई घाबरली आहे. असे पून्हा करणार नाही याचे आश्वासन पोलिसांनी लिखित स्वरूपात या मुलाकडून घेतले आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये 

शनिवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. पीडित आई ही सोफ्यावर बसली आहे. आई घाबरली आहे. मुलाच्या हातात झाडू आहे. ‘जे करायचे ते कर, मी तुला धडा शिकवेल’ अशी धमकी या मुलाने आईला दिली. आपल्याला सर्वासमोर ओरडू नको असे हा मुलगा आईला सांगत आहे. त्याने आईला झाडूने मारण्या अगोदर शिवीगाळही केली. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सर्वांनी या घटनेची निंदा केली.

“सर्वांसमोर ओरडल्यामुळे मुलगा आपल्या आई पासून रागावला होता. आपला मुलाला भवितव्याची काहीच काळजी नसल्याचे आईने शेजाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे.”- तपास अधिकारी, जे पी नगर पोलीस ठाणे

First Published on: December 9, 2018 4:31 PM
Exit mobile version