शीख दंगलीतील दोषी सज्जन कुमारची शरणागती

शीख दंगलीतील दोषी सज्जन कुमारची शरणागती

१९८४ साली झालेल्या शीख दंगली प्रकरणी दोषी आढळलेला काँग्रेस नेता सज्जन कुमारनं न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सज्जन कुमारची रवानगी तिहार जेलमध्ये होणार आहे. सज्जन कुमारपूर्वी महेंद्र यादव आणि किशन खोखर या दोषींनी देखील न्यायालयापुढे शरणागती पत्करली आहे. सज्जम कुमारला शीख दंगलीप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. १९८४ मध्ये दिल्लीतील कँट परिसरात ५ शिखांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी सज्जन कुमारला दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत शरणागती पत्करण्यास सांगितले होतं. सज्जन कुमारला तिहार जेलमधील जेल क्रमांक-२ मध्ये ठेवण्यात येणार अलल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सज्जन कुमारला शीख दंगलीतील शिक्षा भोगत असलेल्या दोषींपासून देखील दूर ठेवण्यात येणार आहे.

First Published on: December 31, 2018 4:18 PM
Exit mobile version