…तर भारतात ‘दिवसाला’ २ लाख ८७ हजार रुग्ण आढळतील; एमआयटीच्या संशोधकांचा दावा

…तर भारतात ‘दिवसाला’ २ लाख ८७ हजार रुग्ण आढळतील; एमआयटीच्या संशोधकांचा दावा

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना एमआयटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्याने सर्वांची झोप उडाली आहे. जर कोरोनावर पुढील वर्षाच्या सुरुवातीस लस सापडली नाही तर देशात दिवसाला २ लाख ८७ हजार रुग्ण आढतील, असा दावा एमआयटीच्या संशोधकांनी केला आहे. ८४ देशांच्या कोरोना चाचण्या आणि कोरोना डेटावर आधारित हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

देशात दररोज रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. तर मृतांचा आकडा २० हजाराच्या पार गेला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाखाच्या पुढे गेला आहे. मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असले तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. असं असताना ‘एमआयटी’च्या संशोधकांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली. एमआयटीचे संशोधक हाजहिर रहमनदाद, टी. वाय. लिम आणि जॉन स्टरमॅन यांनी २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात देशात २ लाख ८७ हजार रुग्ण आढळतील असा दावा केला आहे. तर मे २०२१ मध्ये जगभरात रुग्णांचा आकडा २० ते ६० कोटींवर पोहोचेल. कोरोनावर लस विकसित केली गेली नाही तर सर्वात वाईट परिणाम भारतावर होणार आहे. भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार रुग्ण आढळतील, तर अमेरिकेत ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्ण दररोज आढळतील, असाही दावा या संशोधकांनी केला आहे.


हेही वाचा – नीरव मोदीला दणका; नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती जप्त


 

First Published on: July 8, 2020 8:29 PM
Exit mobile version