टाटा समूह करणार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपात

टाटा समूह करणार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपात

टाटा समूहाच्या इतिहासात प्रथमच टाटा सन्सच्या अध्यक्षांसह इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष आणि ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या वेतनात सुमारे २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक क्रिया ठप्प झाल्या आहेत. ज्याचा सर्व प्रकारच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे. यामुळेच आता टाटा समूहाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार कपातीचा हेतू संस्था आणि कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करणं आणि व्यवसाय मजबूत करणे हा आहे. वास्तविक, टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सर्वप्रथम वेतनात कपात करण्याची घोषणा केली. इंडियन हॉटेल्सने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे की या तिमाहीत त्यांनी त्यांच्या पगाराचा काही भाग सोडला पाहिजे जेणेकरुन कंपनीला मदत करता येईल. वेतन कपातीमध्ये टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल आणि व्होल्टास अशा सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी यांचा समावेश असेल, ज्यांच्या वेतनात २० टक्क्यांनी कपात केली जाणार आहे.


हेही वाचा – विमान प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी


कोरोनामुळे व्यवसाय संकटात

२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये टाटा समूहाच्या पहिल्या १५ कंपन्यांच्या सीईओंचे पॅकेज ११ टक्क्यांनी वाढलं होतं. तर २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ती १४ टक्क्यांनी वाढली आहे. टीसीएस वगळता अद्याप कोणत्याही कंपनीने २०२० चा अहवाल जाहीर केलेला नाही. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे वित्तीय वर्ष २०१९ साठी एकूण पॅकेज ६५.५२ कोटी रुपये असून टाटा सन्सचं ५४ कोटी रुपयांचं कमिशन आहे. २०१८ मध्ये चंद्रशेखरन यांचं वेतन आर्थिक वर्ष २०१८ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढलं आहे.

 

First Published on: May 25, 2020 10:33 PM
Exit mobile version