महाराष्ट्रात सापडलेल्या २१ Delta Plus बाधितांनी घेतली नव्हती कोरोना लस, आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्रात सापडलेल्या २१ Delta Plus बाधितांनी घेतली नव्हती कोरोना लस, आरोग्य विभागाची माहिती

महाराष्ट्रात सापडलेल्या २१ Delta Plus बाधितांनी कोरोना लस घेतली नव्हती,आरोग्य विभागाची माहिती

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus variant ) सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यातील २१ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असल्याचे आढळून आले. डेल्टा प्लसच्या या २१ बाधित रुग्णांविषयी एक धक्कादायक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग डेल्टा प्लसच्या बाधित रुग्णांची माहिती घेत आहे. राज्यातील डेल्टा प्लसच्या २१ बाधित रुग्णांनी कोरोना विरोधी लस घेतली नसल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. डेल्टा प्लसच्या २१ रुग्णांमधील एकानेही कोरोना विरोधी लस घेतली नव्हती. तर त्यातील त्यातील ३ रुग्ण हे १८ वर्षांखालील असल्याने त्यांच्यासाठी अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर १८ रुग्ण लसीसाठी पात्र असूनही त्यांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. (21 Delta Plus variant patients found in Maharashtra did not get corona vaccine – health department)

महाराष्ट्रात आढलेल्या कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने प्रत्येक जिल्ह्यात कोरोना मेगा लसीकरण मोहिम उघडणार असल्याचे देखील डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे. देशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४८ रुग्ण समोर आले आहेत. त्यातील तमिळनाडूमध्ये ९ तर मध्य प्रदेशात ८ केरळ राज्यात ३ आणि पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या बाधित रुग्णांमध्ये एका ८० वर्षींय महिलेचा देखील समावेश आहे. डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रत्नागिरी जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरितील ५ जिल्ह्यातील लसीकरण मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Vaccine: १२ ते १८ वर्षांवरील मुलांना लवकरचं मिळणार Zydus Cadila ची लस, केंद्राने दिली महत्त्वाची माहिती

 

First Published on: June 27, 2021 1:17 PM
Exit mobile version