ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात कोरोना लसीचे २१६ कोटी डोस तयार केले जाणार – केंद्र सरकार

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात कोरोना लसीचे २१६ कोटी डोस तयार केले जाणार – केंद्र सरकार

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात कोरोना लसीचे २१६ कोटी डोस तयार केले जाणार - केंद्र सरकार

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात सर्वात जास्त भर दिला जात आहे. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले. मात्र देशातील हा तुटवडा लवकरच कमी होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात भारतात कोरोना लसीचे २१६ कोटी डोस तयार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सिन लसींसह इतरही लसीही भारतात उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात एकूण ८ कंपन्यांचे मिळून २१६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. यात कोव्हिशिल्ड लसीचे ७५ कोटी डोस, कोव्हॅक्सिन लसीचे ५५ कोटी, बायो व्हॅक्सिन लसीचे २१ कोटी डोस असणार आहेत. त्याचप्रमाणे झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस, नोव्हाव्हॅक्सचे लसीचे २० कोटी जिनोव्हाचे ६ कोटी आणि स्पुटनिक लसीच्या १५ कोटी डोसांचा समावेश असेल, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि.के.पॉल यांनी दिली आहे.

‘भारतात ऑगस्ट ते डिंसेबर महिन्यात २१६ कोटीपेक्षा जास्त डोस तयार केले जातील. WHO आणि FDA ने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात येऊ शकते. येत्या १ ते २ दिवसात त्यासाठी लागणारा परवाना देखिल दिला जाईल’, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


लसीकरणासाठी भारतात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात कोरोना लसीचे १८ कोटी डोस देण्यात आले आहेत. सीरम इंस्टिट्यूट आगस्ट महिन्यापर्यंत १० कोटी आणि भारत बायोटेक कंपनी ७.८कोटी पर्यंत लसीचे उत्पादन वाढवणार आहेत. पुढील ४ महिन्यांसाठी या कंपन्यांनी लसीचे उत्पादन केंद्राकडे सोपवले आहे.

रशियन बनावटीची स्फुटनिक लस भारतात आली आहे. पुढच्या आठवड्यापासून भारतात स्फुटनिक लसही नागरिकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात स्फुटनिक लसीचे उत्पादन भारतात सुरु होईल असेही व्हि.के. पॉल यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात असलेला लसीचा तुटवडा कमी होणार आहे यात शंका नाही.


हेही वाचा – प्लाझ्मा थेरपी होणार दुरुपयोग रोखला पाहिजे, तज्ज्ञांनी लिहिले केंद्राला पत्र

First Published on: May 14, 2021 9:45 AM
Exit mobile version