फेम २ अंतर्गत महाराष्ट्राला २४० ई बस

फेम २ अंतर्गत महाराष्ट्राला २४० ई बस
सार्वजनिक क्षेत्रामध्ये इलेक्टिक बसचा वापर अधिकाधिक वाढावा यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगड या राज्यांना तब्बल ६७० इलेक्ट्रिक बस केंद्र सरकाराकडून देण्यात आल्या आहेत.यामध्ये महाराष्ट्राला २४० ई बस मिळाल्या असून नवी मुंबईला १०० तर मुंबई ४० बस मिळाल्या आहेत. तसेच मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअर या राज्यांना २४१ चार्जिंग स्टेशन मिळाले आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटरद्वारे याची घोषणा केली. पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि गाड्यांपासून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या सरकारच्या सरकारचा निर्णय यातून स्पष्ट होत असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वाहतूक इको-फ्रेंडली असावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोआतून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यामध्ये ६७० ई बसना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये महाराष्ट्राला २४०, गुजरात २५०, गोवा १०० आणि चंदीगडला ८० बसेस देण्यात आल्या. आता फेम २ हा टप्पा तीन वर्षांसाठी असणार आहे. दुसऱ्या टप्प्याला १ एप्रिल २०१९ मध्ये सुरुवात झाली असून त्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. सात हजार ई बस, ५ लाख ई थ्री व्हीलर, ५५०० ई फॉर व्हीलर, आणि १० लाख ई टू व्हीलर यांचा समावेश आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रिकल आणि हायब्रीड वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये केंद्र सरकारने अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत फेम इंडिया हा उपक्रम हाती घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये २ लाख ८० हजार ९८७ हायब्रीड आणि इलेक्ट्रिकल गाड्यांची मागणी विविध राज्यांकडून झाली. त्या पार्श्वभूमीवर ४२५ गाड्यांसाठी २८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर बंगळुरू, चंदीगड, जयपूर आणि दिल्लीमध्ये ५२० चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी ४३ कोटी रुपये मंजूर केले होते.
इलेक्ट्रिकल वाहन मी वर्षभरापासून वापरात आहे. मी आनंदी आहे. एक युनिटमध्ये गाडी १० किलोमीटर जाते. म्हणजे एका किलोमीटरसाठी मला  एका रुपया मोजावा लागत आहे. हे वाहन आर्थिक व प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. 
– प्रकाश जावडेकर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री
First Published on: September 25, 2020 12:28 PM
Exit mobile version