स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का, 256 श्रमिक विशेष गाड्या रद्द

स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का, 256 श्रमिक विशेष गाड्या रद्द

स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का बसणार आहे. कारण श्रमिक विशेष ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी श्रमिक विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत ४०४० मजुरांच्या विशेष गाड्या चालविण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यांनी २५६ गाड्या रद्द केल्या.

आकडेवारीनुसार महाराष्ट्राने 1 मेपासून १०५ गाड्या रद्द केल्या आहेत. तर गुजरातने ४७, कर्नाटकने ३८ आणि उत्तर प्रदेश ३० गाड्या रद्द केल्या आहेत. बहुतांश गाड्या गुजरातमधून सोडण्यात आल्या आहेत. ट्रेन पाठवणारे आणि जिथे पाठवायच्या आहेत अशा राज्यांमध्ये समन्वयाच्या अभावमुळे गाड्या रद्द झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

गाड्या रद्द होण्यामागे चूक कोणाची?

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “आम्ही योग्य प्रोटोकॉलशिवाय गाड्या चालवू शकत नाही. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे पाठविणारी राज्ये आम्हाला गाड्यांमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांची यादी उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे गाड्या रद्द कराव्या लागल्या. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या.


हेही वाचा – लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली, लोक सत्य बोलायला घाबरतात – राजीव बजाज


दरम्यान, गृह मंत्रालयाने श्रमिक विशेष गाड्यांसाठी प्रोटोकॉल बदलला आणि या सेवांसाठीचा गंतव्य राज्यांची संमती रद्द केली. अशा परिस्थितीत येणाऱ्या गाड्या नाकारण्याची शक्यता संपली. महाराष्ट्रानंतर गुजरातने जास्तीत जास्त गाड्या रद्द केल्या, परंतु गुजरातने सर्वाधिक १०२६ श्रमिक विशेष गाड्या चालवल्या आणि १५.१८ लाख कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवलं. यातील ७७ टक्के कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधले होते. महाराष्ट्राने ८०२ गाड्या चालवल्या.

 

First Published on: June 4, 2020 2:45 PM
Exit mobile version