ऑस्ट्रेलियातील मूनी बीचवर तीन भारतीय बुडाले

ऑस्ट्रेलियातील मूनी बीचवर तीन भारतीय बुडाले

ऑस्ट्रेलियामध्ये तीन भारतीयांचा बुडून मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मूनी बीचवर तीन भारतीय बुडाले. ही घटना सोमवारी घडली आहे. असे सांगितले जात आहे की, हे तीन लोकं पाण्यात अडकलेल्या एका मुलाला वाचण्यासाठी समुद्रात उतरले होते. मात्र समुद्राच्या लाटांमुळे ते समुद्रात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. यामधील दोन जणांचा मृतदेह सापडला आहे मात्र एक जण अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. बेपत्ता नागरिकाचा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध सुरु आहे. सोमवारी रात्री अंधार पडल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवले गेले मात्र मंगळवार सकाळपासून पुन्हा शोधमोहिम सुरु केली आहे.

तीन जणांवर उपचार सुरु

या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत. तीन मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यामध्ये १५ आणि १७ वर्षाच्या मुलीचा आणि १५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. असे सांगितले जात आहे की, सिडनीमध्ये राहणारे हे कुटुंबिय सुट्टीनिमित्त याठिकाणी आले होते. त्यावेळी कुटुंबातील ३ मुलं समुद्रात पोहण्यासाठी उतले आणि ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जण गेले असता ते समुद्रात बुडाले.

सुट्टी साजरी करण्यासाठी आले होते

सिडनी आणि ब्रिस्बेनमधील हे दोन कुटुंब सुट्टी साजरी करण्यासाठी या बीचवर आले होते. जवळच्याच एका हॉटेलमध्ये त्यांनी रुम बुक केली होती. सोमवारी संध्याकाळी ते बीचवर फिरायला गेले होते. त्या दरम्यान ही घटना घडली आहे. घौसुद्दीन (४५ वर्ष), त्यांचा जावई जुनैद (२८ वर्ष) आणि राहत (३५ वर्ष) याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व मुळचे भारतातील हैद्राबाद येथून आहेत. यामधील दोन जणांचे मृतदेह सापडले असून जुनैदचा शोध सुरु आहे.

First Published on: December 18, 2018 3:18 PM
Exit mobile version