कमल हसनच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; ३ ठार,१० जखमी

कमल हसनच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; ३ ठार,१० जखमी

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात ३ जाणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. इंडियन २ या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. या शुटींगच्या दरम्यान क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिग्दर्शक शंकर यांचे पर्सनल दिग्दर्शक मधु, सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि एक कर्मचारी चंद्रन यांचा समावेश आहे.

या चित्रपटाचे शूटिंग चेन्नई शहराजवळ सुरू होते. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाता दरम्यान अभिनेते कमल हसन शुटींगस्थळी उपस्थित होते. नाझरथपेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे कारण शोधून काढत आहेत.
अपघाताची खबर प्रथम येताच अग्निशमन व बचाव सेवा कर्मचार्‍यांसह इरुंगट्टुकोटई येथील घटनास्थळी दाखल झाले.

First Published on: February 20, 2020 9:08 AM
Exit mobile version