पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन; एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू

पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन; एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू

पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन

भारताचा ढाण्या वाघ पायलट वर्थमान अभिनंदन हे शुक्रवारी भारतात परतले आहेत. मात्र, सीमेवर भारत – पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकादा शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसत आहे. जम्मू – काश्मीरमधील मेंढार, पुंछ, बालाकोट आणि कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला आहे. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. मोहम्मद युनूस हे जखमी झाले आहेत. तर त्यांची पत्नी रबीन कौसर (३२), फजान (५) आणि मुलगी शबनम (९ महिने) यांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद युनूस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिल्लीत रेड अलर्ट

या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशवाद्यांचा निशाणा असून बऱ्याच ठिकाणी हाय अर्लट देण्यात आला आहे. तसचे दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

चार जवान शहीद

एकीकडे भारताचे पायलट अभिनंद वर्थमान भारतात परत येत असतानाच, दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून शुक्रवारी शस्त्रसंधीच उल्ल्ंघन करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातील कुपवाडा, बालाकोट कृष्णाघाटी आणि हंदवाडा या सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या चकमकीत सुरक्षा दलांचे एकूण नऊ जवान जखमी झाले असून जखमींपैकी ४ जण शहीद झाले आहेत. यामध्ये सीआरपीएफचे निरीक्षक, एक जवान आणि दोन पोलिसांचा समावेश आहे. तर वसीम अहमद मीर हा तरुण गोळीबारात जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


हेही वाचा – ढाण्या वाघ

हेही पहा –  Video: भारत-पाकिस्तान माध्यमांचा कलगीतुरा; ये नहीं देखा तो क्या देखा!


 

First Published on: March 2, 2019 9:33 AM
Exit mobile version