फिलिपिन्समध्ये तीन जहाजं बुडून ३१ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये तीन जहाजं बुडून ३१ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये तीन जहाजं बुडून ३१ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे तीन जहाजे बुडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिनही जहाजांवरच्या जवळपास ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. कोस्ट गार्डचे प्रवक्ते अरमंड बालिलो यांनी याविषयी माध्यमांना माहिती दिली आहे. हवामानाची स्थिती चांगली नसल्याने ही जहाजे बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

६२ प्रवाशांना वाचवण्यात यश

फिलिपिन्समध्ये जहाज बुडल्याच्या घटनेत ६२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सला सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या दुर्घटनेत ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. बुडालेल्या तिसऱ्या जहाजामध्ये सुदैवाने कोणताही प्रवासी नव्हता. मात्र, या जहाजामध्ये असलेल्या पाच क्रू मेंबर्सला बचावण्यात आले आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून येऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि जहाज हेलकावे खाऊ लागले. त्यानंतर एक मोठी लाट आली आणि जहाज उलटले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

First Published on: August 5, 2019 10:54 AM
Exit mobile version