कामगारांसाठी अच्छे दिन? कामाचे दिवस ५ ऐवजी होणार ४ दिवस

कामगारांसाठी अच्छे दिन? कामाचे दिवस ५ ऐवजी होणार ४ दिवस

कामगारांसाठी अच्छे दिन? कामाचे दिवस ५ ऐवजी होणार ४ दिवस

देशात लवकरचं नव्या लेबर कोड नियमांत मोदी सरकाराने महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आणि दिवस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामगारांना आता आठवड्यातून ५ ऐवजी फक्त ४ दिवसच काम करावे लागेल आणि २ दिवसांऐवजी ३ दिवस सुट्टी मिळणार आहे. मोदी सरकाराच्या या निर्णयामुळे कामगारांसाठी अच्छे दिन येणार आहेत. या नव्या कामगार कायद्यांर्गत बदलामुळे येत्या काही दिवसांतच आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळणार आहे. परंतु यावर अंतिम निर्णय कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या सहमतीने घेतला जाणार आहे. तसेच कामाचे तास वाढवून ते १२ तासांपर्यंत नेण्याचा समावेश या नव्या नियमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आठवड्याला कामाचेकमाल तास ४७ होणार आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कामाचे तास कमी होऊ शकतात. असे वृत्त मनीकंट्रोल वृत्तपत्राने दिले आहे.

कामाचे तास, पगार होणार कमी, पीएफ वाढणार

केंद्र सरकारच्या नव्या काद्यानुसार आता कामाचे तास वाढून १२ करण्याचा प्रस्ताव आहे. कर्मचाऱ्यांनी १५ ते ३० मिनिटे अधिक काम केल्यास ही अतिरिक्त वेळ ३० मिनिटे मानून त्याचा ओव्हरटाईममध्ये समावेश केला जाईल. सध्या ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ काम केल्यास तो ओव्हरटाईमध्ये धरला जात नाही. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून सलग ५ तास काम करुन घेऊ नये अशीही एक तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच तास काम केल्यास अर्ध्या तासांचा ब्रेक द्यावा लागणार आहे.

यात पगारात बेसिक पगाराचा भाग ५० टक्क्यांहून अधिक असावा. तसेच बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेतही बदल होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीत कपात होईल आणि पीएफची रक्कम वाढेल.


 

First Published on: June 19, 2021 2:45 PM
Exit mobile version