देशात २४ तासांत १९ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; आकडा ६ लाख पार

देशात २४ तासांत १९ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; आकडा ६ लाख पार

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १९ हजार १४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४ हजार ६४१ वर पोहोचली असून मृतांची संख्या १७ हजार ८३४ झाली आहे. तसेच २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून ३ लाख ५९ हजार ८६० जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात ९० लाख ५६ हजार १७३ जणांची कोरोना चाचणी

देशात आतापर्यंत ९० लाख ५६ हजार १७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ लाख २९ हजार ५८८ जणांची काल बुधवारी चाचणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिली आहे.

राज्यात ५५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली

राज्यात बुधवारी ५५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार २९८ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण ७९ हजार ७५ झाले आहेत. राज्यात १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ८०५३ वर पोहोचली आहे. राज्यात नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर २६, ठाणे मनपा १७, कल्याण डोंबिवली ४, जळगाव ३, पुणे ३,नवी मुंबई १, उल्हास नगर १, भिवंडी १, पालघर १, वसई विरार १, धुळे १ आणि अकोला १ यांचा समावेश आहे.


हेही वाचा – मुंबईत ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज


 

First Published on: July 2, 2020 10:09 AM
Exit mobile version